Posts

Showing posts with the label bhugol

भारत- वनसंपत्ति व प्राणीसंपत्ति

वनसंपत्ती  एखाक्या प्रदेशात वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात. अशा वनस्पतींच्या समूहास वन असे म्हणतात. वनात अनेक प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास असतो.वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.वनापासून अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. भारतातील सुमारे २०% भूभाग वनाच्छादित आहे. सूर्यप्रकाश व पाणी यांवर वनस्पतींची वाढ अवलंबून असते. तसेच मृदा, प्राकृतिक रचना व हवामान यांचाही वनस्पतींवर परिणाम होतो. हवामानानुसार वनांच्या प्रकारातफरक होतो. रंगीत नकाशा क्रमांक ३ मध्ये भारतातील वनांचे प्रकार दाखवले आहेत. भारतात वनांचे पुढील प्रकार आढळतात. (१) सदाहरित वने (२) पानझडी वने (३) काटेरी झुडपी वने (४) समुद्रकाठची वने (५) हिमालयातील वने. (१) सदाहरित वने : सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात ही वने आढळतात. ही वने घनदाट असतात. या वनांतील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या वनांतील झाडांचे लाकूडकठीण, वजनाने जड़ व टिकाऊ असते. सदाहरित वनांत सर्वाधिक जैवविविधता आढळते. या वनांत मो...

भारत - स्थान व विस्तार

Image
स्थान :  पृथ्वीगोलावर भारताचे स्थान शिक्षकांच्या मदतीने पहा. भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे ८°४ उत्तर अक्षवृत्त ते ३७६' उत्तर अक्षवृत्त आणि ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक आहे. हे ६ ४५' उत्तर अक्षवृत्तावर आहे. भारत आशिया खंडाच्या   दक्षिण भागात आहे. विस्तार : भारताचे पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त अंतर सुमारे ३,००० किमी आहे. उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त अंतर सुमारे ३,२०० किमी आहे. भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार मध्यभागी जास्त आहे. उत्तरेस व दक्षिणेस विस्तार कमी होत गेला आहे. भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे. या भागास भारतीय द्वीपकल्पअसे म्हणतात. भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौरस किमी आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा  जगात सातवा क्रमांक लागतो.  भारताची भूसीमा १५,२०० किमी लांबीची आहे. मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास ७,५१७ किमी लांबीचा सागरकिनारा लाभलेला आ...

पर्जन्य

DOWNLOAD PDF पाणी हा जीवसृष्टीचा अस्तित्वात आवश्यक असलेला घटक होय,  आपल्याला पाणी मुख्यतः पर्जन्याच्या स्वरूपात उपलब्ध होते, हेवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होते. हवेत सामावलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण एकत्र येऊन आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांचा जमिनीकडे वर्षाव सुरू होतो, यालाच पाऊस किंवा पर्जन्य असे म्हणतात. पाऊस पडण्याच्या प्रक्रियेतील फरकानुसार पर्जन्याचे तीन प्रकार होतात. १. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य : सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होऊ लागते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे वर जाणाच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते व पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर दिशेत फारशी होत नाही, अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. हवेच्या अशा वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे पडणाच्या पावसाला आरोह पर्जन्य असे म्हणतात. या पावसाला अभिसरण पर्जन्य असेही म्...

वातावरण

Image
पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात, ते वायुरूप असून पृथ्वीशी निगडित असते.. शिलावरण, जलावरण व जीवावरणाप्रमाणे हे महत्त्वाचे आवरण आहे. वातावरणास रंग, गंध आणि चव नसते. जातावरणात हालचाल झाल्यावरच त्याचे अस्तित्व जाणवते, वातावरणाचे घटक : वातावरण मुख्यतः वायू, बाष्प आणि धूलिकण या तीन घटकांनी बनलेले आहे. (अ) वायू : वातावरणात वेगवेगळे वायू असतात. यांत नायट्रोजन व ऑक्सिजन हे प्रमुख वायू आहेत.याशिवाय हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ओझोन इत्यादी वायू वातावरणात असतात. (ब) बाष्प : सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातीलपाण्याचे बागीभवन हात, बाण वातावरणात मिसळते. वातावरणाच्या खालच्या थरात बापाचे प्रमाण जास्त  असते.. (क) धूलिकण : इंधनाचे ज्वलन, वाहतूक, बांधकाम, खाणकाम, वादळे, ज्वालामुखी इत्यादींमुळे असंख्य धूलिकण वातावरणात मिसळतात. वातावरणाच्या खालच्या थरात धूलिकणांचे प्रमाण जास्त असते. धूलिकणांभोवती बाष्प जमा होऊन जलकणांची निर्मिती होते. वातावरणाची रचना : पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसा तापमानात बदल होतो, या बदलांनुसार वातावरणाच...

वारे

Image
वा-यांचे तीन प्रमुख प्रकार आहेत :  (अ) ग्रहीय वारे (आ) स्थानिक वारे  (इ) हंगामी वारे. (अ) ग्रहीय वारे : हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात | ते पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, म्हणून या वा-यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत वाहणा-या ग्रहीय वान्यांना पूर्वीय, पश्चिमी व ध्रुवीय वारे अशी नावे आहेत. (१) पूर्वीय वारे : हे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. यांची सर्वसाधारण दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, म्हणून या वा-यांना पूर्वीय वारे म्हणतात. (२) पश्चिमी वारे : दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय | जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून, उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणा-या या वायांची सर्वसाधारण दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते, म्हणून या वान्यांना पश्चिमी वारे म्हणतात. (३) ध्रुवीय वारे : ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. या वायांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. ...

खडक व खडकाचे प्रकार

खडक : भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाच्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते. खडकांचे प्रकार : निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात. (१) अग्निज खडक ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणा-या लाव्हारसाचे भूपृष्ठावर वशिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणा-या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात. हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होतअसल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. या खडकांत जीवाश्म आढळत नाहीत. अग्निज खडकांचे दोन प्रकार केले जातात. (अ) अंतर्निर्मित अग्निज खडक : ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली । घनीभवन होते, त्यावेळेस तेथे निर्माण होणा-या खडकांना अंतर्निर्मित अग्निज खडक असे म्हणतात. उदा., गॅब्रो, ग्रॅनाइट.या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्याती...

पृथ्वीची आवरणे

पृथ्वीवर जमीन, पाणी, हवा व सजीव हे घटक आहेत.  पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागास शिलावरण असे म्हणतात. तसेच पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास जलावरण असे म्हणतात, पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीस एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. पृथ्वीच्या या चार आवरणाची माहिती आपण शिलावरण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणकिलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलवरन म्हणतात. जमिनीवर दिसणारी पर्वत, पठार ,मैदान इत्यादी भूरूपे व विविध खडक म्हणजे आपल्याला दिसणारा शिलावरणाचा भाग होय, जमिनीमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. शिलावरणाचा वरचा भाग खडकांनी बनलेला आहे. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण होय. खडकांचे निर्मितीनुसार अग्निज,स्तरित व रूपांतरित असे तीन प्रमुख प्रकार आहेत. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंडम्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. ती सात खंडांमध्ये विभागली आहे. या खंडांच्या दरम्यान महासागर आहेत.  जलावरण  पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग मिळून जलावरण तयार होते. महासागर, समुद्र (सागर), सरोवरे, तलाव, नया हे जलावरणाचे भाग...