Posts

Showing posts with the label mpsc bhugol

भारत - जलसंपत्ती व सागरसंपत्ती

भारतात ठरावीक काळात पाऊस पडतो, परंतु सर्वच भागांत तो सारखा पडत नाही. काही भागांत खूप पाऊसपडतो, तर काही ठिकाणी अगदी कमी पाऊस पडतो. पावसाचे पाणी भूपृष्ठावर नव्या, तलाव, सरोवरे इत्यादींद्वारे आपल्याला मिळत असते. यालाच भूपृष्ठीय जल असे म्हणतात. नदीचे बरेचसे पाणी वाहत जाऊन समुद्रास मिळते. पावसाचे काही पाणी जमिनीमध्ये मुरते व ते भूपृष्ठाखालून वाहते किंवा साठते. या भूपृष्ठाखालील पाण्यास भूजल असे म्हणतात. भारतातील पर्जन्याच्या असमान वितरणामुळे अनेकवेळा  उत्तरेकडील ब्रम्हपुत्रा, कोसी, गंडक इत्यादी नद्यांना पूर येतात. चेरापुंजी, मौसिनराम या ठिकाणी सर्वांत जास्त  पाऊस पडतो, तथापि राजस्थान, दक्षिण भारतीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत कमी पाऊस पडतो.   त्यामुळे या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. भारतातील जलसंपत्तीचा वापर मुख्यत्वे नद्या, सरोवरे, नैसर्गिक व मानवनिर्मित तलाव, विहिरी व विंधन विहिरींद्वारे केला जातो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नक्ष्यांना बारा महिने पाणी असते. तेथे नद्यांच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दक्षिणेकडील पठाराव...

भारतातील नद्या

Image
भारतातील नद्या  (अ) हिमालयात उगम पावणा-या नद्या :  उत्तर भारतातील प्रमुख नव्या हिमालयात उगम पावतात. पावसाळ्याशिवाय उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे या नक्यांना उन्हाळ्यातही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नक्ष्यांना वर्षभर पाणी असते. पर्वतीय भागात तीव्र उतारामुळे नद्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. यातून निर्माण झालेला गाळ नक्यांच्या प्रवाहाबरोबर वाहत येतो. मैदानी प्रदेशात आल्यावर या नक्यांचा वेग मंदावतो. नद्यानी वाहून आणलेल्या गाळाचे नदीकाठच्या प्रदेशात संचयन होते, (१) गंगा : गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. गंगेस हिमालयातून उगम पावणा-या व दक्षिणेकडून भारतीय पठारावर उगम पावणा-या अनेक उपनया मिळतात.  यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. यमुना नदीचा उगम हिमालयात यम्नोत्री येथे होतो. गंगा व तिच्या उपनद्यांनी ...

भारत - प्रकृतिक रचना

Image
पर्वत, डोंगररांगा, पठारे, मैदाने, दया अशा अनेक भूरूपांची तुम्ही आतापर्यंत माहिती घेतली आहे. एखाद्या प्रदेशातील भूरूपांचा एकत्रित अभ्यास करणे म्हणजेच त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना जाणून घेणे होय. प्राकृतिक रचनेचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. त्यासाठी देशाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणे आवश्यक असते. भारताचे प्राकृतिक विभाग. (१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश (२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश (३) भारतीय पठारी प्रदेश, (४) किनारी मैदानी प्रदेश (५) भारतीय बेटे (१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश : भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात पर्वतमय प्रदेश आहे. यामध्ये हिमालयाच्या रांगा व इतर पर्वतरांगांचा समावेश होतो. या पर्वतांचा जास्त उंचीचा भाग हिमाच्छादित असतो, म्हणून या पर्वताला हिमालय असे म्हणतात. हिमालय पर्वताचा विस्तार जम्मू आणि काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. भारतातील हिमालयाचे पश्चिम हिमालय व पूर्व हिमालय असे दोन भाग केले जातात. यांच्या दरम्यानचा मध्य हिमालयाचा भाग नेपाळमध्ये आहे. हिमालयाच्या तीन समांतर रांगा आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे या रांगांना शिवालिक, हिमांचल व बृ...

खडक व खडकाचे प्रकार

खडक : भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाच्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते. खडकांचे प्रकार : निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात. (१) अग्निज खडक ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणा-या लाव्हारसाचे भूपृष्ठावर वशिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणा-या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात. हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होतअसल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. या खडकांत जीवाश्म आढळत नाहीत. अग्निज खडकांचे दोन प्रकार केले जातात. (अ) अंतर्निर्मित अग्निज खडक : ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली । घनीभवन होते, त्यावेळेस तेथे निर्माण होणा-या खडकांना अंतर्निर्मित अग्निज खडक असे म्हणतात. उदा., गॅब्रो, ग्रॅनाइट.या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्याती...

सुर्यमाला

Image
सूर्य : हा सूर्यमालेचा प्रमुख आहे. हा तेजस्वी तारा आहे. सूर्य अतितप्त वायंनी बनलेला आहे. सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने सूर्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रह : बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहेत. हे ग्रह साधारणपणे गोलाकार आहेत. ते स्वत:च्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा विशिष्ट कालावधी असतो. उपग्रह : काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहांचे उपग्रह म्हणतात. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. लघुग्रह : सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. । बटुग्रह : नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणा...