भारत- वनसंपत्ति व प्राणीसंपत्ति
वनसंपत्ती एखाक्या प्रदेशात वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात. अशा वनस्पतींच्या समूहास वन असे म्हणतात. वनात अनेक प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास असतो.वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.वनापासून अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. भारतातील सुमारे २०% भूभाग वनाच्छादित आहे. सूर्यप्रकाश व पाणी यांवर वनस्पतींची वाढ अवलंबून असते. तसेच मृदा, प्राकृतिक रचना व हवामान यांचाही वनस्पतींवर परिणाम होतो. हवामानानुसार वनांच्या प्रकारातफरक होतो. रंगीत नकाशा क्रमांक ३ मध्ये भारतातील वनांचे प्रकार दाखवले आहेत. भारतात वनांचे पुढील प्रकार आढळतात. (१) सदाहरित वने (२) पानझडी वने (३) काटेरी झुडपी वने (४) समुद्रकाठची वने (५) हिमालयातील वने. (१) सदाहरित वने : सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात ही वने आढळतात. ही वने घनदाट असतात. या वनांतील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या वनांतील झाडांचे लाकूडकठीण, वजनाने जड़ व टिकाऊ असते. सदाहरित वनांत सर्वाधिक जैवविविधता आढळते. या वनांत मो...