Posts

Showing posts with the label rainfall types

पर्जन्य

DOWNLOAD PDF पाणी हा जीवसृष्टीचा अस्तित्वात आवश्यक असलेला घटक होय,  आपल्याला पाणी मुख्यतः पर्जन्याच्या स्वरूपात उपलब्ध होते, हेवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होते. हवेत सामावलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण एकत्र येऊन आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांचा जमिनीकडे वर्षाव सुरू होतो, यालाच पाऊस किंवा पर्जन्य असे म्हणतात. पाऊस पडण्याच्या प्रक्रियेतील फरकानुसार पर्जन्याचे तीन प्रकार होतात. १. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य : सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होऊ लागते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे वर जाणाच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते व पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर दिशेत फारशी होत नाही, अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. हवेच्या अशा वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे पडणाच्या पावसाला आरोह पर्जन्य असे म्हणतात. या पावसाला अभिसरण पर्जन्य असेही म्...