Posts

Showing posts with the label शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती

Image
 शब्दांच्या जाती (२) शब्दांच्या जाती शब्दांच्या मुरव्य जाती - शब्दांच्या मुरव्यत: दोन जाती असतात. १) विकारी शब्द  २) अविकारी शब्द १) विकारी शब्द - जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रुपात बहुधा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो. त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. उदा - मनुष्य, ती, हसला इ. २) अविकारी शब्द - ज्या शब्दांचा वाक्यात केव्हाही, कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो, त्याना अविकारी शब्द म्हणतात. उदा - हळू, तर, परंतु, इ. शब्दांची कार्ये आठ आहेत. म्हणजेच, शब्दांच्या जाती (कार्ये) आठ आहेत. १) नाम २) सर्वनाम 3) विशेषण ४) क्रियापद ५) क्रियाविशेषण अव्यय ६) शब्दयोगी अव्यय ७) उभयान्वयी अव्यय ८) केक्लप्रयोगी अव्यय यापैकी पहिल्या चार जाती विकारी शब्दांच्या असून पुढच्या चार अविकारी शब्दांच्या जाती आहेत. विकारी शब्दांच्या जाती - अ) नाम आ) सर्वनाम इ) विशेषण ई) क्रियापद विकारी शब्दांच्या जाती अ) शब्दांच्या जाती - नाम नामे - नाम म्हणजे कोणत्याही वस्तूला दिलेले नाव. नामांचे मुरव्य प्रकार तीन - अ) सामान्य नाम ब) विशेषनाम क) भाववाचकनाम नामाचे ...