खडक व खडकाचे प्रकार


खडक : भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाच्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडकांचे गुणधर्म हे
त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.

खडकांचे प्रकार : निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.

(१) अग्निज खडक
ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणा-या लाव्हारसाचे
भूपृष्ठावर वशिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते. त्यापासून
निर्माण होणा-या खडकांना अग्निज खडक असे म्हणतात. हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होतअसल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. या
खडकांत जीवाश्म आढळत नाहीत. अग्निज खडकांचे दोन प्रकार केले जातात.

(अ) अंतर्निर्मित अग्निज खडक : ज्वालामुखी
प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ।
घनीभवन होते, त्यावेळेस तेथे निर्माण होणा-या खडकांना अंतर्निर्मित अग्निज खडक असे म्हणतात. उदा., गॅब्रो, ग्रॅनाइट.या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्यातील
स्फटिकीकरणाची क्रियाही सावकाश होते. त्यामुळे स्फटिक सुस्पष्ट व मोठे असतात.

(ब) बहिर्निर्मित अग्निज खडक : या प्रक्रियेत लाव्हारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणा-या खडकांना बहिर्निर्मित खडक म्हणतात.
उदा., महाराष्ट्र पठारावरील बेसाल्ट खडक.
पृष्ठभागावर आल्यावर लाव्हारस लवकर थंड होतो. त्यामुळे त्यातील स्फटिकीकरणाची क्रिया जलद होते. परिणामी यातील स्फटिक सुस्पष्ट नसतात.

(२) गाळाचे खडक
नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांचे अपक्षरण होते. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. सखल भागात या गाळाचे थरावर थर साचतात. त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थरांवर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्मिती होते.गाळाचे थर एकमेकांवर साचताना अनेकदा त्या थरांमध्ये मृत प्राण्यांचे तसेच वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. म्हणून गाळाच्या खडकांत जीवाश्म आढळतात. या खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. म्हणून त्यांना स्तरित खड्क असेही म्हणतात.
उदा., वाळूचा खडक, चुनखडक, शेल, प्रवाळ खडक.

(३) रूपांतरित खडक
तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन तसेच भू-हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील (अग्निज किंवा गाळाच्या) स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येते. त्यांचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरित खडकांची निर्मिती होते.
खडकांचा रंग व स्फटिकांचा आकार बदलतो. पुनःर्फटिकीकरण झाल्यामुळे या खडकांत जीवाश्म आढळत नाहीत.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ