सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ सन १८५७ पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव आणि १८५७ चा स्वातंत्र्यलढा यांचा अभ्यास आपण केला आहे. त्यानंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते. वासुदेव बळवंत फडके : महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा झाली. त्यांनी वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. हे बंड अयशस्वी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली. तेथेच त्यांचा १८८३ मध्ये मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारला. चाफेकर बंधू : सन १८९७ साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम-जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधंूनी २२ जून १८९७ रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यां...