पृथ्वीची आवरणे


पृथ्वीवर जमीन, पाणी, हवा व सजीव हे घटक आहेत.  पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण
असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागास शिलावरण असे म्हणतात. तसेच पृथ्वीवरील
पाण्याने व्यापलेल्या भागास जलावरण असे म्हणतात, पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीस एकत्रितपणे जीवावरण
म्हणतात. पृथ्वीच्या या चार आवरणाची माहिती आपण

शिलावरण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणकिलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलवरन म्हणतात. जमिनीवर दिसणारी पर्वत, पठार ,मैदान इत्यादी भूरूपे व विविध खडक म्हणजे आपल्याला
दिसणारा शिलावरणाचा भाग होय, जमिनीमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. शिलावरणाचा वरचा भाग
खडकांनी बनलेला आहे. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण होय. खडकांचे निर्मितीनुसार अग्निज,स्तरित व रूपांतरित असे तीन प्रमुख प्रकार आहेत.

जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंडम्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. ती सात
खंडांमध्ये विभागली आहे. या खंडांच्या दरम्यान
महासागर आहेत. जलावरण पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग मिळून जलावरण
तयार होते. महासागर, समुद्र (सागर), सरोवरे, तलाव, नया हे जलावरणाचे भाग आहेत. जलाचा सर्वात मोठा
साठा महासागरात असतो.

(१) महासागर : पृथ्वीवरील खाच्या पाण्याच्या
विशाल साठ्यास महासागर म्हणतात. पॅसिफिक,
अटलांटिक, हिंदी, आर्टिक हे चार महासागर आहेत. हे
सर्व महासागर सलग आहेत.

(२) समुद्र किंवा सागर : महासागरापेक्षा
आकारमानाने लहान असणा-या खाच्या पाण्याच्या
साठ्यास समुद्र किंवा सागर म्हणतात. बहुतेक समुद्र हे
महासागराचे भाग आहेत. उदाहरणार्थ, अरबी समुद्र हा
हिंदी महासागराचा भाग आहे. काही समुद्र हे
महासागरांना जोडलेले नसतात, ते पूर्णपणे किंवा
बहुतांशी जमिनीने वेढलेले असतात. त्यांना भूवेष्टित
समुद्र म्हणतात. उदा., कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र.

(३) उपसागर : खाच्या पाण्याच्या ज्या
जलाशयाच्या तीनही बाजू भूभागांनी वेढलेल्या
असतात, अशा जलाशयास उपसागर म्हणतात.
उपसागर सागरापेक्षा लहान असतो. उदा., बंगालचा
उपसागर,

(४) आखात : जमिनीत घुसलेल्या सागराच्या - जलरूप
अरुंद भागास आखात म्हणतात. उदाहरणार्थ, खंभातचे
आखात.

(५) सामुद्रधुनी : दोन सागरांना जोडणा-या
सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात.
उदाहरणार्थ, पाल्कची सामुद्रधुनी. ही अरबी समुद्र व
बंगालच्या उपसागरास जोडते.

वातावरण
हवा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, मात्र हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतो. थंड हवा, उष्ण हवा अशा प्रकारे आपण हवेचे वर्णन करतो. पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात.
वातावरण विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी घटकांपासून बनलेले आहे.
पृथ्वीच्या पृष्ठालगतच्या वातावरणातील हवा दाट असते. पृष्ठापासून जसजसे उंच जावे, तसतशी हवा
विरळ होत जाते. वातावरणातील हवेचे तापमान
उंचीनुसार बदलते. वातावरणातून सर्व सजीवाना जगण्यासाठी आवश्यक (ऑक्सिजन) मिळतो.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ