Posts

Showing posts with the label mpsc

भारत- वनसंपत्ति व प्राणीसंपत्ति

वनसंपत्ती  एखाक्या प्रदेशात वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात. अशा वनस्पतींच्या समूहास वन असे म्हणतात. वनात अनेक प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास असतो.वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.वनापासून अनेक प्रकारची उत्पादने मिळतात. भारतातील सुमारे २०% भूभाग वनाच्छादित आहे. सूर्यप्रकाश व पाणी यांवर वनस्पतींची वाढ अवलंबून असते. तसेच मृदा, प्राकृतिक रचना व हवामान यांचाही वनस्पतींवर परिणाम होतो. हवामानानुसार वनांच्या प्रकारातफरक होतो. रंगीत नकाशा क्रमांक ३ मध्ये भारतातील वनांचे प्रकार दाखवले आहेत. भारतात वनांचे पुढील प्रकार आढळतात. (१) सदाहरित वने (२) पानझडी वने (३) काटेरी झुडपी वने (४) समुद्रकाठची वने (५) हिमालयातील वने. (१) सदाहरित वने : सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात ही वने आढळतात. ही वने घनदाट असतात. या वनांतील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या वनांतील झाडांचे लाकूडकठीण, वजनाने जड़ व टिकाऊ असते. सदाहरित वनांत सर्वाधिक जैवविविधता आढळते. या वनांत मो...

भारतातील नद्या

Image
भारतातील नद्या  (अ) हिमालयात उगम पावणा-या नद्या :  उत्तर भारतातील प्रमुख नव्या हिमालयात उगम पावतात. पावसाळ्याशिवाय उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे या नक्यांना उन्हाळ्यातही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नक्ष्यांना वर्षभर पाणी असते. पर्वतीय भागात तीव्र उतारामुळे नद्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. यातून निर्माण झालेला गाळ नक्यांच्या प्रवाहाबरोबर वाहत येतो. मैदानी प्रदेशात आल्यावर या नक्यांचा वेग मंदावतो. नद्यानी वाहून आणलेल्या गाळाचे नदीकाठच्या प्रदेशात संचयन होते, (१) गंगा : गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. गंगेस हिमालयातून उगम पावणा-या व दक्षिणेकडून भारतीय पठारावर उगम पावणा-या अनेक उपनया मिळतात.  यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. यमुना नदीचा उगम हिमालयात यम्नोत्री येथे होतो. गंगा व तिच्या उपनद्यांनी ...

पर्जन्य

DOWNLOAD PDF पाणी हा जीवसृष्टीचा अस्तित्वात आवश्यक असलेला घटक होय,  आपल्याला पाणी मुख्यतः पर्जन्याच्या स्वरूपात उपलब्ध होते, हेवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होते. हवेत सामावलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण एकत्र येऊन आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांचा जमिनीकडे वर्षाव सुरू होतो, यालाच पाऊस किंवा पर्जन्य असे म्हणतात. पाऊस पडण्याच्या प्रक्रियेतील फरकानुसार पर्जन्याचे तीन प्रकार होतात. १. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य : सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होऊ लागते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे वर जाणाच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते व पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर दिशेत फारशी होत नाही, अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. हवेच्या अशा वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे पडणाच्या पावसाला आरोह पर्जन्य असे म्हणतात. या पावसाला अभिसरण पर्जन्य असेही म्...