वाक्य
वाक्य वाक्य - पुऱ्या अर्थाच्या बोलण्यात दोन किंवा अधिक शब्द असतात. केव्हा केव्हा एका शब्दाने देरवील वाक्याचा अर्थ पुरा झाला असे वाटते. जा. ये. बैस. पण या प्रत्येक शब्दाच्या मागे तू" हा शब्द गुप्त असतो. पुर्या अर्थाच्या प्रत्येक बोलण्यास “वाक्य” असे म्हणतात. वाक्य हे पुर्या अर्थाचे बोलणे असते. उदा: (१) नदी वाहते. हे एक वाक्य आहे. यात दोन शब्द आहेत. (२) मांजर दृध पिते". हे ही एक वाक्य आहे. यात तीन शब्द आहेत. स्वाध्याय : - वाक्ये बनवा - (१) शिक्षक मुलांना ............................ (२) ......................... दागिने घडवितो (3) मी पुस्तक ...................... (४) ........................ वास येतो. (५) पोपट पिंजऱ्यात ...................................... (६) ....................................... पाणी पितो. वाक्याचे दोन भाग प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो, व काहीतरी बोलतो, उदा. “शिवाजी राजा होता? या वाक्यात आपण शिवाजीबद्दल बोलतो, आणि शिवाजीबद्दल “राजा होता” असे बोलतो. म्हणून प्रत्येक वाक्याचे दोन भाग होतात. “कोणाबद्दल बोलतो" तो ए...