Posts

Showing posts with the label suryamala

सुर्यमाला

Image
सूर्य : हा सूर्यमालेचा प्रमुख आहे. हा तेजस्वी तारा आहे. सूर्य अतितप्त वायंनी बनलेला आहे. सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने सूर्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रह : बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहेत. हे ग्रह साधारणपणे गोलाकार आहेत. ते स्वत:च्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा विशिष्ट कालावधी असतो. उपग्रह : काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहांचे उपग्रह म्हणतात. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. लघुग्रह : सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. । बटुग्रह : नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणा...