समास
समास समास - दोन किंवा दोनांपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस “समास” म्हणतात, अशा रीतीने तयार झालेल्या संयुक्त (जोडशब्द) शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. उदा.,- राजाचा वाडा - राजवाडा हा सामासिक शब्द. ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासातील पदे असे म्हणतात. उदा.,- राजवाडा या समासातील राजा व वाडा ही दोन पदे आहेत. समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे सहाय्य घेऊन त्यांची फोड करावी लागते. ह्या फोड करण्याच्या पद्धतीला त्या समासाचा विग्रह असे म्हणतात. उदा., १) तोंडपाठ तोंडाने पाठ (विग्रह) २) सत्यासत्य - सत्य किंवा असत्य समासाचे एकूण चार प्रकार आहेत १) अव्ययीभाव समास २) तत्पुरुष समास 3) द्वंद्व समास ४) बहुव्रीही समास १) अव्ययीभाव समास - किंवा (प्रथमपद प्रधान समास) - ज्या समासात विशेषत: पहिले पद मुरव्य असते किंवा पहिला शब्द अव्यय असतो आणि सर्...