Posts

Showing posts with the label mahajanpade

जनपदे आणि महाजनपदे

Image
जनपदे आणि महाजनपदे ६.१ जनपदे  ६.२ महाजनपदे  ६.३ मगध साम्राज्याचा उदय ६.१ जनपदे - साधारणपणे इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या ‘अश्मक’ या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यांतील काही जनपदांमध्ये राजेशाही होती. काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची ‘गणपरिषद’ असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत, त्या सभागृहास ‘संथागार’ असे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती   ६.२ महाजनपदे  काही ज...