Posts

Showing posts with the label religious india

धार्मिक समन्वबय

धार्मिक समन्वबय भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्‍्तिमार्गास महत्त्व आले. या मार्गात अधिकारभेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला. भक्ती चळवळ : भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार आणि अळवार या भक्‍ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णुभक्‍त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत, असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून “हरिहर' या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळींमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते. ईशबरप्रेम, ...