समतेचा लढा
समतेचा लढाशेतकरी चळवळ : शेतकरी चळवळ : ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत. जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे. ते शेतकऱ्यांवर अन्याय करत. या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले. बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला. दीनबंधूमित्र यांच्या ‘नीलदर्पण’ या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली. १८७५ साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचारांविरुद्ध मोठा उठाव केला. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने १९१८ साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ‘किसान सभा’ ही संघटना स्थापन केली. केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. १९३६ साली प्रा. एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने ‘अखिल भारतीय किसान सभा’ स्थापन झाली. स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक होते. या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. १९३६ साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे ...