युरोप आणि भारत

युरोप आणि भारत आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. प्रबोधनयुग : युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’ असे म्हणतात. प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलां- क्षेत्रांत आपणांस प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना अाणि संवेदनांचे ...