महाराष्ट्र - लोकसंख्या लोकजीवन

लोकसंख्या मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योग धन्द्यांची झापाटयाने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. उदा., मुंबई, पुणे, नागपूर, नदी खोर्यांच्या सुपिक भागातही लोकसंख्या जास्त आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ९ कोटी ६८ लक्ष इतकी आहे. जनगणना २००१ नुसार मुंबई उपनगर जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. आरोग्याच्या व वैक्यकीय सोई-सुविधा, साथीच्या रोगांचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात झालेली सुधारणा, तसेच देशाच्या इतर भागांतून रोजगारानिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकजीवन लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकांवर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते. यालाच लोकजीवन म्हणतात, ग्रामीण व शहरी लोकजीवनांत बराच फरक आढळतो. शहरी भागात लोकवस्ती दाट असते. शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब...