Posts

Showing posts with the label ब्रिटिश सत्तेचे परिणाम

ब्रिटिश सत्तेचे परिणाम

Image
ब्रिटिश सत्तेचे परिणाम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना :  भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगिजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रजपोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. परंतु, भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले.  इंग्रज व मराठे :  मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. १७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली. पहिल्...