स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण : ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोईसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतांतील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली. आर्थिक शोषण : भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गांनी इंग्लंडकडे सुरू झाला. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावणे, शेतसाऱ्याचे ओझे, सततचे दुष्काळ यांमुळे भारतीय शेतीचा कणा मोडला. पारंपरिक उदयोगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते. मध्यम वर्गावर नवनवे कर लादले. यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. पाश्चात्त्य शिक्षण :...