मुघलांशी संघर्ष
मुघलांशी संघर्ष शायिस्तारानाची स्वारी फेब्रुवारी १६६० मध्ये शायिस्ताखान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबर हानी केली. चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला. परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला. शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महालात शायिस्ताखान तळ ठोकून बसला. तेथून आसपासच्या मुलखाची त्याने लूट चालूच ठेवली. दोन वर्ष झाली, तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्याचा विचार करत नव्हता. त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणे स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत महाराजांनी एक धाडसी बेत आखला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली. त्यानुसार ५ एप्रिल १६६३ रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. या छाप्यात शायिस्ताखानाची बोटे तुटली. त्याची मानहानी झाली. त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम...