भारत - खनिज संपत्ति व उर्जा साधने
खनिजे खनिजांचे धातू व अधातू खनिजे असे प्रकार आहेत. धातू खनिजे : ज्या खनिजांपासून धातू तयार करता येतात त्यांना धातू खनिजे असे म्हणतात. (१) लोहखनिज : भारतात उत्तम दर्जाच्या लोहखनिजाचे साठे आहेत. लोहखनिजापासून लोह व पोलादाची निर्मिती केली जाते. लोह व पोलादापासून विविध प्रकारची यंत्रे, शेतीची अवजारे, वाहने, घरगुती उपकरणे इत्यादी तयार करतात. पोलाद तयार करण्यासाठी लोहखनिज, चुनखडक व दगडी कोळसा आवश्यक असतो. ओडिशा, झारखंड, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यांत लोहखनिजाचे साठे आढळतात. (२) तांबे : हा धातू भांडी, नाणी, पत्रा, दागिने तयार करण्यासाठी वापरतात. तांबे उत्तम वीजवाहक आहे. त्यामुळे विजेच्या उपकरणांत याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. झारखंड, राजस्थान, गुजरात आंध्र प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांत तांब्याचे साठे आहेत. (३) मँगनीज : पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा तू खनिजे प्रामुख्याने उपयोग होतो. देशात मॅगनीजचे भरपूर साठे असून त्याचा दर्जाही उत्तम आहे. कर्नाटक, ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गोवा या राज्यांत म...