मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यरक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. या सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला *मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम' असे म्हणतात. इ.स.१६८२ मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला. तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले. हा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज: संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. त्या वेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता. अशा स्थितीतऔरंगजेब बादशाहाचा मुलगा शाहजादा अकबर याने पित्याविरुदू्ध बंड केले. हे बंड बादशाहाने मोडूनकाढले. मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्याचे पारिपत्य करण्यासाठीबादशाह स्वतः इ.स.१६८२ मध...