प्राचीन भारत : सांस्कृतिक
प्राचीन भारत : सांस्कृतिक भाषा आणि साहित्य लोकजीवन विज्ञान शिक्षणाची केंद्र स्थापत्य आणि कला भाषा आणि साहित्य प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्यनिर्मिती झाली. त्यांमध्ये धार्मिक साहित्य, व्याकरणग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथासाहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. संघम साहित्य - संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य ‘संघम साहित्य’ म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वांत प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील ‘सिलप्पधिकरम’ आणि ‘मणीमेखलाई’ ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. संघम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. धार्मिक साहित्य - यामध्ये आगमग्रंथ, तिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. ‘जैन आगमग्रंथ’ अर्धमागधी, शौरसेनी आणि माहाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगमग्रंथांमध्ये संकलित करण्या...