भारत - जलसंपत्ती व सागरसंपत्ती
भारतात ठरावीक काळात पाऊस पडतो, परंतु सर्वच भागांत तो सारखा पडत नाही. काही भागांत खूप पाऊसपडतो, तर काही ठिकाणी अगदी कमी पाऊस पडतो. पावसाचे पाणी भूपृष्ठावर नव्या, तलाव, सरोवरे इत्यादींद्वारे आपल्याला मिळत असते. यालाच भूपृष्ठीय जल असे म्हणतात. नदीचे बरेचसे पाणी वाहत जाऊन समुद्रास मिळते. पावसाचे काही पाणी जमिनीमध्ये मुरते व ते भूपृष्ठाखालून वाहते किंवा साठते. या भूपृष्ठाखालील पाण्यास भूजल असे म्हणतात. भारतातील पर्जन्याच्या असमान वितरणामुळे अनेकवेळा उत्तरेकडील ब्रम्हपुत्रा, कोसी, गंडक इत्यादी नद्यांना पूर येतात. चेरापुंजी, मौसिनराम या ठिकाणी सर्वांत जास्त पाऊस पडतो, तथापि राजस्थान, दक्षिण भारतीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत कमी पाऊस पडतो. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. भारतातील जलसंपत्तीचा वापर मुख्यत्वे नद्या, सरोवरे, नैसर्गिक व मानवनिर्मित तलाव, विहिरी व विंधन विहिरींद्वारे केला जातो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नक्ष्यांना बारा महिने पाणी असते. तेथे नद्यांच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दक्षिणेकडील पठाराव...