स्वराज्याचा कारभार

स्वराज्याचा कारभार अष्टप्रधान मंडळ : महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले.राज्यकारभाराच्या सोईसाठी त्याची आठ खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. आठ खात्यांत आठ प्रमुख मिळून 'अष्टप्रधान मंडळ' बनले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे, हा महाराजांचा अधिकार होता. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. शिवाजी महाराजांनी गुण ब कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. त्यांना इनामे, वतने किंबा जहागिरी दिल्या नाहीत; रोख पगार मात्र भरपूर दिला. शेतीविषयीचे धोरण : शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये, अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष...