मौर्यकालीन भारत
मौर्यकालीन भारत ७.१ ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी ७.२ मौर्य साम्राज ७.१ ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी - ग्रीक सम्राट अलेक्झांडर ऊर्फ सिकंदर याने इ.स.पू. ३२६ मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोचण्यात सिकंदर यशस्वी झाला, मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना ‘सत्रप’ असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इ.स.पू. ३२३ मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते, त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव...