Posts

Showing posts with the label indian population

भारतातील लोकसंख्या व लोकजीवन

लोकसंख्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात लोकसंख्येत सातत्याने वाढ झालेली दिसून येते. वैद्यकीय उपचारांच्या सुविधा, साथीच्या रोगांचे निर्मुलन, राहणीमानातील सुधारणा यांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु जन्माचे प्रमाण मात्र फारसे कमी झालेले नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढलेली दिसते. सन २००१ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या  १०२ कोटी ७० लक्ष आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. देशाच्या काही भागांत लोकसंख्या जास्त आहे, तर काही भागांत कमी आहे. नक्ष्यांची सुपीक खोरी, चांगल्या हवामानाचे प्रदेश, सर्व सोई सहज उपलब्ध असलेल्याठिकाणी लोकवस्ती जास्त आहे. उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोक खेड्यांतून शहरांत येऊन राहतात. शहरांत राहणा-या लोकांची संख्याही जास्त असते. देशातील वाळवंटी प्रदेश, उंच पर्वतरांगांमधील दुर्गम प्रदेश अशा ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. दर चौरस  किमी क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात याचे प्रमाण. काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात. पश्चिम बंगाल हे सर्वांत जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे...