Posts

Showing posts with the label oldest south india kingdom

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

Image
दक्षिण भारतातील प्राचीन राज्य  चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी सातवाहन राजघराणे  वाकाटक राजघराणे  चालुक्य राजघराणे  पल्लव राजघराणे  राष्ट्रकूट राजघराणे    चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी  दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील तीन राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. ेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत. या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे. तमिळ भाषेतील संघम साहित्यात या तीन राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहे. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या पुस्तकात ‘मुझिरीस’ हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. मुझिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्...