विकारी शब्दांच्या जाती
विकारी शब्दांच्या जाती आ) शब्दांच्या जाती - सर्वनाम सर्वनामे - स्वत:चा असा काही विशेष अर्थ नसून सर्व नामांच्या बद्दल उपयोगात येणारा जो विकारी शब्द त्यास सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे अर्थदृष्टया प्रकार सहा आहेत - ( आ) पुरुषवाचक सर्वनाम (ब) दर्शक सर्वनाम (क) संबंधी सर्वनाम (ड) प्रश्नार्थक सर्वनाम (इ) सामान्य किंवा अनिश्चित सर्ववास (फ) आत्मवाचक सर्वनाम. मराठीत एकंदर सर्वनामे नऊच आहेत - मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः आ) पुरुष वाचक सर्वनाम - तीन प्रकार आहेत. १) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम २) दृवितीय पुरूषवाचक सर्वनाम 3) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम. १) प्रथम पुरूषवाचक सर्वनाम - बोलणाऱ्या व्यक्तीने स्वत:विषयी वापरळेली सर्वनामे उदा. - मी, आम्ही, आपण, स्वत: व त्यांची विभक्ती प्रत्यये. २) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम - बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते, त्यांच्या विषयी वापरलेली सर्वनामे. उदा. - तू. तुम्ही, आपण, स्वत: व त्यांची विभक्ती प्रत्यये. ३) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम - बोलणारी व्यक्ती ज्यांच्या विषयी बोलते त्यांच्या विषयी वापरलेली सर्वनामे. उदा. - तो, ती, त...