Posts

Showing posts with the label मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

Image
मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये शुंग घराणे  इंडो-ग्रीक राजे  कुशाण राजे  गुप्त राजघराणे  वर्धन राजघराणे   ईशान्य भारतातील राजसत्ता  शुंग घराणे  सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची  हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला.  इंडो-ग्रीक राजे या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना ‘इंडो-ग्रीक राजे’ असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो-ग्रीक राजांमध्ये मिनँडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनँडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नांतून ‘मिलिंदपञ्ह’ या ग्रंथाची नि...