पर्जन्य


पाणी हा जीवसृष्टीचा अस्तित्वात आवश्यक असलेला घटक होय,  आपल्याला पाणी मुख्यतः पर्जन्याच्या स्वरूपात उपलब्ध होते, हेवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होते. हवेत
सामावलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण एकत्र येऊन आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांचा जमिनीकडे वर्षाव सुरू होतो, यालाच पाऊस किंवा पर्जन्य असे म्हणतात.

पाऊस पडण्याच्या प्रक्रियेतील फरकानुसार पर्जन्याचे तीन प्रकार होतात.

१. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य :
सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होऊ लागते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते.
त्यामुळे वर जाणाच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते व पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर दिशेत फारशी होत नाही, अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो.
हवेच्या अशा वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह
असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे पडणाच्या पावसाला आरोह पर्जन्य असे म्हणतात. या पावसाला अभिसरण पर्जन्य असेही
म्हणतात. विषुववृत्तीय भागात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा चमचमाट व ढगांचा गडगडाट होतो.

२. प्रतिरोध पर्जन्य : समुद्रावरून किंवा मोठ्या
जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. मार्गात येणा-या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनसरून ते वरवर जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. डोंगर किंवा उंचवट्याच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो, म्हणून
प्रकारे पडणा-या पावसाला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात,
ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वरवर जातात, त्या
उतारावर पाऊस जास्त पडतो, तर पर्वत ओलांडल्यावर येणा-या भागात वाच्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवेची बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. अशा कमी पाऊस पडणाच्या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.

३. आवर्त पर्जन्य : एखाक्या प्रदेशात आवर्ताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते. हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य म्हणतात. आवर्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना ते ज्याप्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पडतो. तसेच उष्ण
पट्ट्यामध्ये देखील काही प्रमाणात आवर्त पर्जन्य' पडतो. तो
वादळी स्वरूपाचा असतो.वरील तीन प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य
जगात सर्वांत जास्त भागांत पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक
स्वरूपाचा पर्जन्य आहे. हि पर्जन्यामध्ये बरीच नि पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडण्याध्ये बरीच निश्चितता असते. त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यास
पर्जन्यक्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पुर  अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड यावे लागते.
पर्जन्य वितरण : पृथ्वीवर पर्जन्याचे वितरण असमान आढळून येते. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जावे तसा पाऊस कमी होत जातो. सोबतच्या नकाशात समपर्जन्य रेषांच्या साहाय्याने
जगातील पर्जन्य वितरण दाखवलेले आहे. समान पर्जन्य असणाच्या ठिकाणांना
जोडणाच्या नकाशावरील रेषांना समपर्जन्य रेषा म्हणतात.



१. कमी पर्जन्याचा प्रदेश :
 वार्षिक सरासरी पर्जन्य ५००मिमी पेक्षा कमी आहे, अशा भागाचा समावेश या प्रदेशात
होतो. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी बरेच मोठे भूक्षेत्र कमीपर्जन्य प्रदेशात येते. यात खंडांचे अतिउत्तरेकडील शीत वओसाड प्रदेश, तसेच आशियाचा व उत्तर आफ्रिकेचा खंडांतर्गत भाग, दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंट व मध्य ऑस्ट्रेलियाचा वाळवंटी प्रदेश यांचा समावेश होतो. या प्रदेशात
प्रामुख्याने काटेरी वनस्पती आढळतात.

२. मध्यम पर्जन्याचा प्रदेश : ५०० ते १००० मिमी वर्षिक सरासरी पर्जन्य असणाच्या भागांचा यात समावेश होतो. यात प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि आशिया खंड, दक्षिणआफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांचे पूर्वभाग समाविष्ट होतात. या भागांत प्रामुख्याने गवताळ प्रदेशआढळतात.

३. जास्त पर्जन्याचा प्रदेश : वार्षिक सरासरी पर्जन्य
१००० मिमी पेक्षा जास्त असलेले भाग या प्रदेशात येतो.
विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २०° अक्षवृत्तापर्यंतच्याभागात जास्त पर्जन्य होतो. त्यातही आग्नेय आशिया, भारतीय उपखंडाचा काही भाग, मध्य आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनचे खोरे या भागात पर्जन्यमान सुमारे २००० मिमीपेक्षा जास्त आहे. याशिवाय २०° उत्तर व दक्षिणअक्षवृत्ताच्या पलीकडील द. अमेरिका, आग्नेय चीन, संयुक्त संस्थानांचा आग्नेय भाग हे जास्त पावसाच्या प्रदेशात येतात. याप्रदेशात प्रामुख्याने वनांचा समावेश होतो.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ