स्वराज्यस्थापना
स्वराज्यस्थापना सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व उदयास आले. त्यांनी येथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनीनिजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. या शहाजीराजे मोहिमेत बिजापूरच्या आदिलशाहाने मुघलांशी सहकार्य केले. मुघलांचादक्षिणेत प्रवेश होऊ नये, ही शहाजीराजांची भावना होती. म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. इ.स.१६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे बिजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापू ब चाकण हे परगणे ...