शिवपूर्वकालीन भारत
शिवपूर्वकालीन भारत आठव्या शतकातील 'पाल' हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. मध्य भारतात गुर्जर-प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनोज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होत. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. तमिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुबर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोबिंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनोजपासून रामेश््वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. शिलाहारांची तीन घराणी पश्चिम म...