भारत - स्थान व विस्तार



स्थान :  पृथ्वीगोलावर भारताचे स्थान शिक्षकांच्या
मदतीने पहा. भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे ८°४ उत्तर अक्षवृत्त ते ३७६' उत्तर अक्षवृत्त आणि ६८°७'
पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक आहे. हे ६ ४५' उत्तर अक्षवृत्तावर आहे. भारत आशिया खंडाच्या   दक्षिण भागात आहे.

विस्तार : भारताचे पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त अंतर
सुमारे ३,००० किमी आहे. उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त अंतर सुमारे ३,२०० किमी आहे.
भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार मध्यभागी जास्त आहे. उत्तरेस व दक्षिणेस विस्तार कमी होत गेला आहे. भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे. या भागास भारतीय द्वीपकल्पअसे म्हणतात.
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौरस किमी आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा  जगात सातवा क्रमांक लागतो.  भारताची भूसीमा १५,२०० किमी लांबीची आहे. मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास ७,५१७ किमी लांबीचा सागरकिनारा लाभलेला आहे.

सीमा -
भारत हे आशिया खंडातील एक प्रमुख राष्ट्र आहे.
भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस हिंदी महासागर, तर प्रश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहेत. उतरेस चीन,नेपाळ आणि भूटान हे देश आहेत. पूर्वेस बांग्लादेश व म्यानमार हे देश आहेत.
भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरात श्रीलंका, मालदीव आणि आग्नेयेस इंडोनेशिया आहे. हे सर्व भारताचे
शेजारील देश आहेत.

राजकीय विभाग :
भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे.
भारतात २८ घटक राज्ये व ७ संघराज्य क्षेत्रेआहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
भारतातील घटक राज्ये,राज्य, संघराज्य क्षेत्रे व त्यांच्या राजधान्या यांचा तक्ता तयार करा.
क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेश व तिसरा
क्रमांक महाराष्ट्राचा आहे. गोवा हे भारतातील सर्वात कमीक्षेत्रफळ असलेले राज्य आहे.

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य