मराठी शुद्ध लेरवनाचे नियम
(१) मराठी शुद्ध लेरवनाचे नियम अ) अनुस्वार १) नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा. उदा. डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ. २) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा. उदा. लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ. 3) आदरार्थी अनेकवचनी (बहुक््चनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार दृयावा. उदा, शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ. ४) पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये. जसे - का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे. पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण - या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही) आ) ऱ्हस्व - दीर्घ अक्षरे १) इ - कारान्त आणि (उ - कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.उदा - मी, कवी, गुरू, बाहू जू. क्रषी, गती, वही, गहू पेरू, वाळू, शत्रू. परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार ऱ्हस्व होतात. उदा - विद्यार्थिभांडार क्रषिकुमार, कविचरित्र, लघुकथा, शत्रुपक्ष इ. अपवाद - आते, आणि, नि...