Posts

Showing posts with the label सविनय कायदेभंग चळवळ

सविनय कायदेभंग चळवळ

Image
सविनय कायदेभंग चळवळ लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले.  मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते. त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह हा प्रतीकात्मक होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा व्यापक हेतू होता.  मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. १२ मार्च १९३० रोजी गांधीजी ७८ सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. सुमारे ३८५ किमीच्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांम...