Posts

Showing posts with the label maharashtra bhugol

महाराष्ट्र : जलसंपत्ती व सागरसंपत्ती

Image
महाराष्ट्र : जलसंपत्ती व सागरसंपत्ती सजीवांसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला नदी, विहीर, तलाव इत्यादींपासून पाणी मिळते.  या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेती, कारखानदारी, वीजनिर्मिती व घरगुती कामासाठी करतो. सागराचे पाणी खारे असते. सागरापासून आपल्याला विविध उपयुक्त संपत्ती मिळते. जलसंपत्ती महाराष्ट्रातील प्रमुख जलस्रोत : नद्या, धरणे, तलाव, विहिरी इत्यादी प्रमुख जलस्रोत आहेत. विहिरी आणि कूपनलिका : विहीर हे महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. पावसाचे पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांमध्ये झिरपून जमिनीमध्ये साठते. याला भूजल म्हणतात. हे पाणी विहिरी व कूपनलिका यांद्वारे उपलब्ध केले जाते.  महाराष्ट्रात बेसाल्ट या अग्निज खडकाचे प्रमाण जास्त आहे. हा खडक कठीण व अछिद्र असल्याने यामध्ये भूजलाची उपलब्धता मर्यादित असते. नदीकिनारी, गाळाच्या किंवा सच्छिद्र खडकांच्या प्रदेशात विहिरींचा व कूपनलिकांचा वापर पाणी मिळवण्यासाठी केला जातो. शेतीसाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर होतो.  राज्यातील भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने कूपनलिका व विहिर...