भारत- वनसंपत्ति व प्राणीसंपत्ति

वनसंपत्ती 
एखाक्या प्रदेशात वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात.
अशा वनस्पतींच्या समूहास वन असे म्हणतात. वनात अनेक प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास असतो.वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.वनापासून अनेक प्रकारची उत्पादने मिळतात.
भारतातील सुमारे २०% भूभाग वनाच्छादित आहे. सूर्यप्रकाश व पाणी यांवर वनस्पतींची वाढ अवलंबून
असते. तसेच मृदा, प्राकृतिक रचना व हवामान यांचाही वनस्पतींवर परिणाम होतो. हवामानानुसार वनांच्या प्रकारातफरक होतो. रंगीत नकाशा क्रमांक ३ मध्ये भारतातील वनांचे प्रकार दाखवले आहेत. भारतात वनांचे पुढील प्रकार आढळतात.

(१) सदाहरित वने
(२) पानझडी वने
(३) काटेरी झुडपी वने
(४) समुद्रकाठची वने
(५) हिमालयातील वने.


(१) सदाहरित वने : सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त
पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात ही वने
आढळतात. ही वने घनदाट असतात. या वनांतील वृक्षांची
पाने रुंद व हिरवीगार असतात. या वनांतील झाडांचे लाकूडकठीण, वजनाने जड़ व टिकाऊ असते. सदाहरित वनांत सर्वाधिक जैवविविधता आढळते. या वनांत मोहगनी, शिसव, रबर इत्यादी वृक्ष व अनेक प्रकारच्या वेली आढळतात. सह्याद्रीच्या दक्षिण भागात, हिमालयाच्या
पायथ्यालगत व पूर्व भारतात ही वने आढळतात. नैसर्गिक रबर, लाकडी सामान, इमारती व जहाजबांधणी यांसाठी या वनांचा उपयोग होतो.

(२) पानझडी वने: १००० ते २००० मिमी
पर्जन्याच्या प्रदेशात ही वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पाने गळतात. वड, पिंपळ, साग, बांबू इत्यादी वनस्पती या
वनात आढळतात. भारतात पानझडी वनांचे क्षेत्र इतर वनांपेक्षा बरेच मोठे
आहे. सह्याद्रीचा उत्तरेचा भाग, विंध्य, सातपुडा, मैकल, छोटा नागपूरचे पठार, हिमालयाचा पायथ्याकडील भाग,पूर्वांचल इत्यादी प्रदेशांत ही वने आढळतात. वेताचे सामान, कागद निर्मिती, इमारत व जहाजबांधणी यांसाठी या वनातील लाकडाचा उपयोग होतो.

(३) काटेरी व झुडपी वने : दीर्घकाळ कोरडा
उन्हाळा व ५०० मिमीपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात वने आढळतात. दीर्घकाळ उष्ण व कोरडे हवामान
असलेल्या प्रदेशातील वनस्पतींमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. ते कमी होण्यासाठी वनस्पतींची पाने
आकाराने लहान असतात व त्यावर लव असते. त्यांच्या पानांवर व फांद्यांवर काटे असतात. काही वनस्पतींची
खोडे मांसल असतात. या वनांतील झाडांची मुळे जमिनीत खोलवर जातात. खैर, बाभूळ, खेजडी, कोरफड,  घायपात इत्यादी वनस्पती येथे आढळतात. भारतीय पठारावरील पर्जन्यछायेचा प्रदेश, राजस्थान,
सौराष्ट्र व कच्छच्या भागांत ही वने प्रामुख्याने आढळतात. यांतील वनस्पतींचा इंधनासाठी व औषधांसाठी उपयोग होतो

(४) समुद्रकाठची वने :
किना-यालगत दलदलीच्या भागात, खाड्यांच्या व खाजणांच्या भागात क्षारयुक्त मृदाव दमट हवामान असते, अशा ठिकाणी ही वने आढळतात. या वनांतील वनस्पतींना खारफुटी असे म्हणतात.
सुंदरबनमध्ये आढळणारी सुंद्री ही वनस्पतीसुद्धा खारफुटीचाच एक प्रकार आहे. खारफुटी वनस्पतीचे लाकड तेलकट, हलके व टिकाऊ असते. वनस्पतींची मुळे जमिनीच्या बाहेर आलेली असतात. मुळांद्वारे खारफुटी वनस्पती श्वसनाचे कार्य करतात. या वनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते.
किनारी प्रदेशात वभारतीय बेटांच्या किना-यालगत कमी-अधिक प्रमाणात हीवने आढळतात. इंधनासाठी व होड्या तयार करण्यासाठी या वनांतील लाकडाचा वापर केला जातो.

(५) हिमालयातील वने : हिमालयामध्ये उंचीनुसार
वेगवेगळ्या प्रकारची वने आढळतात. त्याचप्रमाणे वनस्पती प्रकारही बदलतात.

(अ) अति उंचीवरील बर्फाच्छादित भागातील बर्फ
वितळल्यावर विविध फुलझाडे उगवतात. या वनस्पती आकाराने लहान असतात. त्यांचा जीवनक्रम केवळ
महिना-दोन महिन्यांचा असतो.

(ब) यापेक्षा कमी उंचीवरील भागात पाईन, देवदार, फर असे वृक्ष असलेली सूचिपर्णी वने आढळतात.

(क) हिमालयाच्या पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. यामध्ये प्रामुख्याने सूचिपर्णी व पानझडी
वनातील वृक्ष आढळतात. साल वृक्षाचे प्रमाण या भागातजास्त आहे. वन असलेल्या क्षेत्रातील वातावरण आल्हाददायक व उत्साहवर्धक असते. याच कारणाने निसर्गाच्या ओढीने
अनेक वेळा आपण वनक्षेत्र असलेल्या प्रदेशास पर्यटक म्हणून भेट देतो. भारतातील हिमालय पर्वतरांगांतील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, दक्षिण भारतातील सायलेंट व्हॅली, वेगवेगळी राष्ट्रीय उड्याने ही सर्व रमणीय ठिकाणे
पर्यटकांचे आकर्षण बनली आहेत. 

हे वनांमुळे पर्यटन व्यवसायास चालना मिळते. अनेक देशी-विदेशी पर्यटक वनसंपदा असलेल्या क्षेत्रास भेटी देतात.खारफुटीसारख्या वनस्पतींमुळे किनारी प्रदेशाचा वेगवान लाटांपासून बचाव होतो. वनाच्छादित क्षेत्रामुळे
भूजल पातळीचा योग्य प्रकारे समतोल राखला जातो. वनांनी व्याप्त क्षेत्रात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक व सूक्ष्मजीव वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी वनक्षेत्र हे सुरक्षित निवारा असते. या सर्व बाबींमुळे वनप्रदेश नैसर्गिक पर्यावरणाचे व जैविक समूहाचे उत्तम उदाहरण बनतात.

प्राणी संपत्ती
भारतीय वनांत अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आढळतात. ती आपली प्राणी संपत्ती आहे. हिमालय पर्वतीय क्षेत्रात कस्तुरीमृग, स्नो-लेपर्ड, अस्वले, लाल पांडा इत्यादी प्राणी व पर्वतीय गरुड प्रामुख्याने दिसून येतात. जंगली गाढवे, काळवीट, लांडगे, खोकड इत्यादी प्राणी शुष्क व काटेरी वनात असतात. शेकरू खार हा
सह्याद्री वनक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. गुजरातमध्ये गीरच्या वनांत आशियाई सिंह आढळतात.
महाराष्ट्रातील पानझडी वनांच्या क्षेत्रात गवा हा प्राणी आढळतो. ओसाड गवताळ भागात माळढोक पक्षी
आढळतो. नीलगाय ही भारतीय द्वीपकल्पात मध्यम पावसाच्या वनक्षेत्रात दिसून येते. आसाममध्ये एकशिंगी
गेंडा आढळतो. सुंदरबन व पानझडीच्या वनांत पट्टेदार वाघ आढळतो. तरस, रानडुक्कर, सांबर, कोल्हा,
बिबट्या, हरिण, ढोल (रानटी कुत्रे) इत्यादी प्राणी वेगवेगळ्या वनांत आढळतात. मोर, खंड्या, रंगीबेरंगी
पोपट, कोतवाल, दयाळ इत्यादी पक्षीसुद्धा वनांत आढळतात. सरोवरे, नया व सागरात अनेक प्रकारची
कासवे, जलचर प्राणी, मगरी आढळतात. मोठी सागरी कासवे चिल्का सरोवराच्या परिसरात येतात.
वने व प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. वन्य प्राण्यांच्या अधिवासामुळे वनांच्या तोडीला आळा बसतो. विविध प्राणी, पक्षी व कीटकांद्वारे अनेक वनस्पतींचा बीजप्रसार होतो व त्यामुळे वनांची वृद्धी होते. एखाद्या
प्रदेशातील वनक्षेत्र कमी होऊ लागले, की तेथील वन्य प्राण्यांना स्थलांतर करावे लागते किंवा ते नष्ट होतात. ज्या प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांच्या संवर्धनावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. व्याघ्रप्रकल्प हे एक उत्तम उदाहरण आहे.


गाळलेल्या जागा भरा.
(अ) सुंदरबनात आढळणारी सुंद्री ही वनस्पती -----
प्रकार आहे.
(बांबूचा, खारफुटीचा, गवताचा)

(आ) शुष्क व काटेरी वनांच्या प्रदेशात ------
आढळतो.
(खोकड, ढोल, नीलगाय)

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ