Posts

Showing posts with the label indian seasons mpsc bhugol

भारतातील हवमान

भारताचा मोठा अक्षवृत्तीय विस्तार, उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडचा विशाल सागरी भाग यांचा भारतीय हवामानावर खूप परिणाम होतो. मान्सूनची निर्मिती : मान्सूनचा अर्थ ऋतूनुसार बदलणारे वारे असा होतो. उन्हाळयात भारताच्या उत्तर व वायव्य भागांत भूभागावर तापमान जास्त असते, त्यामुळे वायुदाब कमी असतो, तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान कमी असते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो. या महासागरावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून भूभागावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. त्यांची दिशा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे असते. यास नैर्ऋत्य मान्सून (मोसमी) वारे म्हणतात. याउलट हिवाळ्यात भारताच्या भूभागावर तापमान कमी असते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो, तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान जास्त असते, त्यामुळे तेथे वायुदाब कमी असतो, म्हणून भूभागावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून महासागरावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. त्यांची दिशा ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे असते. यास ईशान्य मान्सून वारे म्हणतात. ऋतू : ऋतूंच्या निर्मितीमध्ये तापमान आणि पर्जन्य हे दोन घटक महत्त्वपूर्ण असतात. भारताच्या हव...