शब्द विचार (३.१) शब्द विचार - लिंग विचार (१) लिंग विचार - शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरूषत्वाचा, स्त्रीत्वाचा त्याशिवाय निराळ्या प्रकारचा जो बोध होतो, त्यास लिंग असे म्हणतात. घोडा या शब्दाचे पुरुषत्व व गाय या शब्दाचे स्त्रीत्व अर्थाच्या दृष्टीने वास्तविक आहे. परंतु दरवाजा, वीट यात दरवाज्याचे पुरुषत्व व वीटेचे स्त्रीत्व हे काल्पनिक स्वरूपाचे आहे. लिंगाचे तीन प्रकार - १) पुल्लिंग २) स्त्रीलिंग 3) नपुंसकलिंग १) पुल्लिंग - ज्या शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो, त्यास पुल्लिंगी शब्द म्हणतात. २) स्त्रीलिंग - ज्या शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक स्त्रीत्वाचा बोध होतो, त्यास स्त्रीलिंगी शब्द म्हणतात. ३) नपुंसकलिंग - ज्या शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरूषत्व किंवा स्त्रीत्व या पेक्षा निराळ्या प्रकारचा बोध होतो, त्या शब्दास नपुंसकलिंगी शब्द असे म्हणतात. आपणास सर्वनामावरून लिंग ओळरवता येते. उदा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नरपुसकलिंग तो दरवाजा ती वही ते पुस्त...