Posts

Showing posts with the label वाक्याचे पृथकरण

वाक्याचे पृथकरण

 वाक्याचे पृथकरण पुर्‍या अर्थाच्या शब्द समृहास वाक्‍य म्हणतात. वाक्यात दोन किंवा अधिक शब्द असतात. प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद ही असतात. क्रियापद सकर्मक असल्यास वाक्यात कर्म असते. क्रियापद अकर्मक असल्यास वाक्यात कर्म नसते.वाक्यात कर्ता, कर्म व क्रियापद याशिवाय इतर शब्दही असतात. -  कर्त्याविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द कर्त्यापूर्वी येतात, कर्माविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द कर्मापूर्वी येतात.व क्रियापदाविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द क्रियापदापूर्वी येतात. कर्त्याविषयी शब्द व कर्ता. (कर्म असल्यास) कर्माविषयी शब्द व कर्म, क्रियापदाविषयी शब्द व क्रियापद अशी साधारणत:वाक्यरचना असते. उदा. रानटी पोपट झाडावरील पिकलेला पेरू भरभर रवातो. या वाक्यात “रानटी पोपट हे उद्देश्य व “झाडावरील पिकलेला पेरू भरभर रवातो” हे विधेय. आता प्रत्येक भागाची पुन्हा फोड करू. कर्ता व कर्त्याचा विस्तार ही उद्देश्य भागात येतात. कर्म व कर्माचा विस्तार ही विधेय भागात येतात व क्रियापदाचा विस्तार व क्रियापदही विधेय भागातच येतात. आ) उद्देश्य भागाचे दोन भाग पडतात. १) कर्त्याचा विस्तार २) कर्त...