Posts

Showing posts with the label india history for mpsc upsc

भारतीय उपखंड आणि इतिहास

भारतीय उपखंड आणि इतिहास १.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये  १.२ भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये  १.३ भारतीय उपखंड  १.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये   आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते, हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला, याचा आपण आढावा घेतला.  इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते.  उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रद...