Posts

Showing posts with the label वैदिक संस्कृती

वैदिक संस्कृती

वैदिक संस्कृती ४.१ वैदिक वाङ्मय  ४.२ कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन  ४.३ शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन  ४.४ धर्मकल्पना  ४.५ शासनव्यवस्था  ४.१ वैदिक वाङ्मय  ‘वेद’ वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत. या चार वेदांच्या ग्रंथांना ‘संहिता’ असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे. त्यापासून ‘वेद’ ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ‘ज्ञान’ असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना ‘श्रुति’ असेही म्हणतात.  ऋग्वेद संहिता -  ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ‘ऋग्वेद’ होय. ‘ऋचा’ म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला ‘सूक्...