प्राचीन भारत आणि जग
प्राचीन भारत आणि जग भारत आणि पश्चिमेकडील देश हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचापश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. पुढे सिकंदर ज्या मार्गांनी आला, ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस ‘गांधार शैली’ असे म्हटले जाते. या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळतीजुळती आहे. भारतात...