Posts

Showing posts with the label Maratha Empire

मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार

मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार शाहू महाराजांची सुटका औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शाहजादा आझमशाह हा दक्षिणेत होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल, असे आझमशाहाला वाटले. म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराजांचा राज्याभिषेक : कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपतीपदावरील हक्‍क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यांमध्ये लढाई  झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. इ.स.१७१० मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर ...