सामाजिक व धार्मिक प्रबोधन
सामाजिक व धार्मिक प्रबोधन भारतीय समाजाचे मागासलेपण त्यांच्या अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांत आहे, याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतिपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ‘भारतीय प्रबोधन’ असे म्हणतात. धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व :- ब्राह्मो समाज : राजा राममोहन रॉय यांनी इ.स.१८२८ मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्चनीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना वि...