अविकारी शब्द
अविकारी शब्द अविकारी शब्दात व्यय म्हणजे बदल होत नाही. म्हणून त्यांस अव्यये म्हणतात. अविकारी शब्दांचा वाक्यात केंव्हाही व कोणत्याही प्रकारचा बदल न करता नेहमी उपयोग केला जातो. अविकारी शब्दांचे प्रकार अविकारी शब्दांचे चार प्रकार आहेत. उ) क्रिया विशेषण अव्यये, ऊ) उभयान्वयी अव्यये, ए) शब्दायोगी अव्यये, ऐ) केवलप्रयोगी अव्यये उ) क्रिया विशेषण अव्यये, - क्रियेचे स्थल, काल, रीति. संरव्या इ. कोणत्याही प्रकारचे वैशिष्टय दारवविणारा जो अविकारी शब्दआहे त्याला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषण अव्यये अर्थदृष्ट्या सामान्यतः चार प्रकारची आढळतात अ) स्थलवाचक ब) कालवाचक क) रीतिवाचक ड) परिमाणवाचक किंवा संरव्यावाचक. अ) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये - क्रिया कोठे घडली, तिचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणारा शब्द. उदा. येथे रवेळू नका. आमची शाळा घरापासून जवळ आहे. येथे, तेथे, पलीकडे, सभोवार, वर, रखवाली, आत, मागे, पुढे इ. शब्द त्यांच्या वाक्यातील क्रिया कोठे घडते या बद्दलची विशेष माहिती सांगतात. ब) कालवाचक क्रियाविशेषण अव्यये - क्रिया घडण्याचा काळ द...