Posts

Showing posts with the label वाक्याचे प्रयोग

वाक्याचे प्रयोग

वाक्याचे प्रयोग प्रयोग - वाक्याचे महत्त्वाचे घटक तीन आहेत. कर्ता, कर्म व क्रियापद. क्रिया करणारा कर्ता. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म. कर्ता व कर्म ह्यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुष ह्या संदर्भात असतो. क्रियापदाचे कर्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय. मुरव्य प्रयोग तीन आहेत - १) कर्तरी प्रयोग २) कर्मणी प्रयोग ३) भावे प्रयोग १) कर्तरी प्रयोग - कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथमा असते  ब) कर्माची विभक्ती दुवितीया असते.  क) कर्त्याच्या लिंग, वचनाप्रमाणे क्रियापद बदलते.  कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार - अ) सकर्मक कर्तरी ब) अकर्मक कर्तरी आ) सकर्मक कर्तरी प्रयोग - कर्तरी प्रयोगात जर कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय - उदा. सलोरव पुस्तक वाचतो. कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापद बदलते. स्नेहल पुस्तक वाचते. मुलगा चित्र काढतो. कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. मुले वित्र काढतात. ब) अकर्मक कर्तरी प्रयोग - कर्तरी प्रयोगात कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी प...