Posts

सविनय कायदेभंग चळवळ

Image
सविनय कायदेभंग चळवळ लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले.  मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते. त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह हा प्रतीकात्मक होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा व्यापक हेतू होता.  मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. १२ मार्च १९३० रोजी गांधीजी ७८ सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. सुमारे ३८५ किमीच्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांम...

असहकार चळवळ

Image
असहकार चळवळ इ.स.१९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ‘गांधीयुग’ या नावाने ओळखला जातो.  १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली.  गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली.  गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.  गांधीजींचे दक्षिण अाफ्रिकेतील कार्य :  महात्मा गांधी १८९३ मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई. त्यांचा जागोजागी अपमान केला जात असे. १९०६ मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते, त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला.  ...

स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण :  ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोईसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतांतील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली.  आर्थिक शोषण :  भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गांनी इंग्लंडकडे सुरू झाला. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावणे, शेतसाऱ्याचे ओझे, सततचे दुष्काळ यांमुळे भारतीय शेतीचा कणा मोडला. पारंपरिक उदयोगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते. मध्यम वर्गावर नवनवे कर लादले. यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता.  पाश्चात्त्य शिक्षण :...

सामाजिक व धार्मिक प्रबोधन

Image
सामाजिक व धार्मिक प्रबोधन भारतीय समाजाचे मागासलेपण त्यांच्या अंधश्रद्‍धा, रूढिप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांत आहे, याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतिपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्‍वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ‘भारतीय प्रबोधन’ असे म्हणतात.  धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व :- ब्राह्मो समाज :   राजा राममोहन रॉय यांनी इ.स.१८२८ मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्चनीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्‍धती यांना वि...

१८५७ चा स्वातंत्र्यलढा

Image
१८५७ चा स्वातंत्र्यलढा १८५७ साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. हा लढा काही अचानक उद्‍भवला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते. १८५७ च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेणा दिली.  १८५७ पूर्वीचे लढे :  भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरांतून शोषण होत आहे याची  जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत गेला. शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. अशातच १७७० मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन मात्र उदासीन व संवेदनशून्य राहिले. सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले.  ...

ब्रिटिश सत्तेचे परिणाम

Image
ब्रिटिश सत्तेचे परिणाम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना :  भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगिजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रजपोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. परंतु, भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले.  इंग्रज व मराठे :  मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. १७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली. पहिल्...

युरोप आणि भारत

Image
युरोप आणि भारत आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो.  प्रबोधनयुग : युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’ असे म्हणतात. प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलां- क्षेत्रांत आपणांस प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना अाणि संवेदनांचे ...