भारत - प्रकृतिक रचना
पर्वत, डोंगररांगा, पठारे, मैदाने, दया अशा अनेक
भूरूपांची तुम्ही आतापर्यंत माहिती घेतली आहे. एखाद्या
प्रदेशातील भूरूपांचा एकत्रित अभ्यास करणे म्हणजेच त्या
प्रदेशाची प्राकृतिक रचना जाणून घेणे होय. प्राकृतिक रचनेचा
मानवी जीवनावर परिणाम होत असतो. त्यासाठी देशाच्या
प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणे आवश्यक असते.

भारताचे प्राकृतिक विभाग.
(१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
(३) भारतीय पठारी प्रदेश,
(४) किनारी मैदानी प्रदेश
(५) भारतीय बेटे
(१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
(३) भारतीय पठारी प्रदेश,
(४) किनारी मैदानी प्रदेश
(५) भारतीय बेटे
(१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश : भारताच्या उत्तर
आणि पूर्व भागात पर्वतमय प्रदेश आहे. यामध्ये हिमालयाच्या रांगा व इतर पर्वतरांगांचा समावेश होतो. या पर्वतांचा जास्त उंचीचा भाग हिमाच्छादित असतो, म्हणून या पर्वताला हिमालय असे म्हणतात. हिमालय पर्वताचा विस्तार जम्मू आणि काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. भारतातील हिमालयाचे पश्चिम हिमालय व पूर्व हिमालय असे दोन भाग केले जातात. यांच्या दरम्यानचा मध्य हिमालयाचा भाग नेपाळमध्ये आहे. हिमालयाच्या तीन समांतर रांगा आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे या रांगांना शिवालिक, हिमांचल व बृहहिमालय अशी नावे आहेत.

या रांगांची उंची उत्तरेकडे वाढत जाते. या रांगांशिवाय झास्कर,लडाख व काराकोरम या रांगांचा व लडाखचे पठार यांचा समावेश पश्चिम हिमालयात होतो. या भागात अनेक सरोवरे आहेत. त्यांपैकी काही सरोवरे खाच्या पाण्याची आहेत. या पर्वतात उगम पावणाच्या अनेक नद्यांच्या खनन कार्यामुळे खोल दर्या तयार झाल्या आहेत.
सिप्की, जोझी, निती, काराकोरम, बनिहाल इत्यादी खिंडी या भागात आहेत.
हिमालयाची उंची ६०० मीटरपासून ८००० मीटरपर्यंत आहे. काही शिखरांची उंची ८००० मीटरपेक्षा जास्त आहे. के-२,गाशेरब्रुम, नंगापर्वत, नंदादेवी अशी अनेक उंच शिखरे या रांगांत आहेत. यांपैकी के-२ (८६११ मीटर) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.

हिमालय पर्वताची उंची पूर्व भागाकडे कमी होत जाते.
कांचनजंगा (८५९८ मीटर) हे पूर्व हिमालयातील सर्वांत उंच शिखर आहे. पूर्व हिमालयातून अनेक नव्या दक्षिणेकडे वाहत येतात. या भागात नथू, जेलप, बोमडी इत्यादी खिंडी
आहेत. पतकोई, नागा, लुशाई या पूर्वेकडील डोंगररांगांना एकत्रितपणे पूर्वांचल असे म्हणतात. मेघालय पठारावर गारो, खासी व जैतिया या डोंगररांगा आहेत. हिमालय पर्वतामुळे
उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात. त्यामुळे या वायांपासून भारतीय प्रदेशाचे रक्षण होते.
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश :
उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश आणि भारतीय पठारी प्रदेशाच्या दरम्यान उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. हिमालयात व पठारी प्रदेशात उगम पावणा-या नक्ष्यांनी वाहून आणलेला गाळ साचून हा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. या प्रदेशाची उंची ३०० मीटरपर्यंत आहे. या मैदानी प्रदेशाचे पूर्व मैदान व पश्चिम मैदान असे दोन भाग होतात.
पश्चिमेकडील मैदानी प्रदेश सतलज व तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळापासून तयार झाला आहे.
पावसाचे कमी प्रमाण असल्याने व एकही मोठी नदी नसल्याने पश्चिम मैदानाचा दक्षिण भाग शुष्क वाळवंटी
बनला आहे. यास भारतीय महावाळवंट म्हणतात. या भागात खाच्या पाण्याची अनेक सरोवरे आहेत.

पूर्व मैदानी प्रदेश गंगा व तिच्या उपनक्यांनी वाहन आणलेल्या गाळामुळे निर्माण झालेला आहे. ब्रम्हपुत्रा व
तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या मैदानाचा समावेशसुद्धा या मैदानात होतो. पूर्व मैदानी प्रदेशातून वाहणा-या बहुतेक सर्व नक्ष्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. नद्यांनी
वाहून आणलेला गाळ पात्रात साचून पात्र उथळ होते. त्यामुळे या नद्यांना वारंवार पूर येतात. नया आपले
प्रवाह ब-याच वेळा बदलतात. कोसी व गंडक या नद्या यासाठी प्रसिद्ध आहेत. हा मैदानी प्रदेश नक्ष्यांनी वाहून
आणलेल्या गाळाच्या संचयनाने सुपीक बनला आहे.

(३) भारतीय पठारी प्रदेश : हा प्राकृतिक विभाग
विस्ताराने सर्वांत मोठा आहे. या प्रदेशाची उंची ३०० मीटर ते १५०० मीटरच्या दरम्यान आहे. पठाराचा बहुतेक भाग सपाट असला, तरी काही पर्वतांच्या रांगा या पठारावर दिसून येतात. त्यांचे स्थान आकृती ९.३ मध्ये पहा.
नर्मदा, शोण या नद्यांमुळे भारतीय पठाराचे

(अ) उत्तर भारतीय पठार व
(ब) दक्षिण भारतीय पठार
असे दोन विभाग होतात.
(अ) उत्तर भारतीय पठार : उत्तर भारतीय पठारी
प्रदेशात मुख्यतः मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंडइत्यादी पठारांचा समावेश होतो. अरवली पर्वत या
पठाराच्या वायव्य भागात आहे. हा एक अतिप्राचीन पर्वत आहे. या पर्वताच्या भागात संगमरवर खडक आढळतो. अरवली पर्वताच्या ईशान्य भागात साभर हे खाच्या पाण्याचे
सरोवर आहे. या पर्वतातील गुरुशिखर (१७२२ मीटर) हे सर्वांत उंच शिखर आहे. विंध्य पर्वत पूर्व-पश्चिम दिशेत
पसरलेला आहे. याचा उत्तरेकडील उतार मंद आहे. अरवलीच्या पश्चिम उताराकडे मारवाडचे पठार आहे, तर
पूर्व उतारावर मेवाडचे पठार आहे. या पठाराच्या पूर्वेस माळवा व बुंदेलखंडचे पठार आहे. या पठारांवरून चंबळ,
सिंद, बेटवा व केन या नव्या उत्तरेस वाहतात.

(ब) दक्षिण भारतीय पठार : हे पठार अतिप्राचीन
खडकांचे बनलेले आहे. यात महाराष्ट्र पठार, तेलंगण पठार व कर्नाटक पठार यांचा समावेश होतो. ही पठारे म्हणजे मुख्यतः सातपुडा, पश्चिम घाट (सह्याद्री) व पूर्व घाट। यांच्या दरम्यानचा द्वीपकल्पाचा भाग होय. शोण नदीच्या दक्षिणेस बाघेलखंड पठार आहे. त्याच्या पूर्वेस छोटा
नागपूर पठार आहे.

दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असेही म्हणतात. महाराष्ट्र पठाराचा उतार पूर्वेकडे
दे या पठारावर अजिंठा, बालाघाट, महादेव इत्यादी डोंगरांच्या रांगा आहेत. पश्चिम घाट अरबी समुद्रास
समांतर आहे. अनैमुडी शिखर (२६९५ मीटर) हे पश्चिम घाटातील सर्वांत उंच शिखर आहे. निलगिरी पर्वताच्या
दक्षिणेस पालघाट नावाची खिंड आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण सह्याद्री अलग झालेले आहेत. पूर्व घाट बंगालच्या उपसागरास समांतर आहे. त्याच्या दक्षिणेकडील रांगांना
नल्लामल्ला असे नाव आहे. पठारावरील प्रमुख पूर्व वाहिनी नद्या पूर्व घाट ओलांडताना अरुंद घळईमधून जातात. श्रीशैलमजवळील कृष्णा नदीने केलेली घळई प्रसिद्ध आहे.

भारतीय पठार अतिप्राचीन खडकांचे बनलेले आहे. येथे खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते. छोटा
नागपूरचे पठार व अरवली पर्वत हे यासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र पठारावरील काळी मृदा ही कापसाच्या पिकासाठी उपयुक्त आहे. या पठारावर लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे.
(४) किनारी मैदानी प्रदेश : किनारी मैदानी
प्रदेशाचे पूर्व किनारी मैदान व पश्चिम किनारी मैदान असे दोन भाग होतात.
पूर्व किनारी मैदान बंगालचा उपसागर व पूर्व घाटयांच्या दरम्यान आहे. हा प्रदेश गाळाचा बनलेला असून
कमी उताराचा आहे. पूर्व किनारी मैदानी प्रदेश पश्चिमकिनारी मैदानापेक्षा विस्ताराने मोठा आहे. हा प्रद
नयाच्या त्रिभुज प्रदेशांनी बनलेला आहे. महानदी,गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी नयांचा यात प्रामुख्यान
समावेश होतो.

पूर्व किना-यावर चिल्का, पुलिकत, कोलेरू इत्यादी सरोवरे आहेत. हा किनारा दतुर
नसल्यामुळे नैसर्गिक बंदरे कमी आहेत.भारताच्या पश्चिम किना-यालगत असलेला सखल
मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदान म्हणून ओळखलाजातो, कच्छच्या रणापासून कन्याकुमारीपर्यंत पश्चिम
किनारी मैदान पसरलेले आहे. उत्तरेकडे या मैदानाची रुंदी।जास्त आहे. दक्षिण भागाकडे रुंदी कमी आहे. पश्चिम किनारी प्रदेशातील नया वेगाने वाहतात. त्यांच्या मुखाजवळ खाड्या तयार झालेल्या आहेत. दक्षिणेकडे
खाजण सरोवरे तयार झाली आहेत. त्यांना कायल म्हणतात. वेबनाड हे मोठे खाजण सरोवर आहे.

(५) भारतीय बेटे : भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी
भागात अनेक लहान-मोठी बेटे आहेत. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील काही बेटांचे समूह हे भारतीय प्रदेशाचे भाग आहेत. पश्चिम किना-यालगतची दीवसारखी बहुतेक बेटे ही मुख्य भूमीचेच वेगळे झालेले भाग आहेत, तर पूर्व किना-यालगतची श्रीहरिकोटासारखी अनेक बेटे वाळूच्या संचयनाने बनलेली आहेत. अरबी
समुद्रात असलेल्या बेटांच्या समूहास लक्षद्वीपअसे म्हणतात. या बेटांची
निर्मितीप्रवाळांच्या संचयनातून झाली आहे. ही बेटे विस्ताराने लहान या बेटाची उंची कमी आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान-निकोबार बेटांचा समूह आहे.

यातील बहुतेक बेटे ही जलमग्न पर्वतांची शिखरे आहेत. ही बेटे विस्ताराने मोठी
आहेत. त्यांचा मध्यभाग डोंगराळ आहे. उत्तर अंदमान बेटावरील सँडल (७३८ मीटर) हे शिखर
सर्वात उंच आहे.

अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार
समूहात काही प्रवाळ बेटे आढळतात
समूहात काही प्रवाळ बेटे आढळतात